वाशी (प्रतिनिधी)- जागतिक एड्स निर्मूलन सप्ताहाचे औचित्य साधून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी आणि ग्रामीण रुग्णालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये एड्सविषयी जनजागृती करणे हा होता.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शामसुंदर डोके, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयानंद कवडे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनंत पाटील, प्रा. डॉ. दैवशाला रसाळ, प्रा. डॉ. नेताजी देसाई, प्रा. मिलिंद शिंदे, प्रा. अजितकुमार तिकटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. संतोष बुधोडकर, एड्स समुपदेशक श्री. परमेश्वर तुंदारे तसेच आरोग्य कर्मचारी श्री. बाबासाहेब नितळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात रेड रिबन क्लबचे सदस्य श्री. सोहेल शेख यांनी एड्स आजाराची माहिती व प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करून केली. त्यानंतर प्रभारी प्राचार्य प्रा. शामसुंदर डोके यांनी एड्स जनजागरणाची सामाजिक गरज असल्याचे मत व्यक्त केले.

महाविद्यालय परिसरातून प्रभारी प्राचार्य प्रा. शामसुंदर डोके व एनएसएस विभागाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली ग्रामीण रुग्णालय परिसरापर्यंत काढण्यात आली. ग्रामीण रुग्णालय येथे एड्स समुपदेशक परमेश्वर तुंदारे यांनी एड्सची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मोफत उपचार सुविधांची माहिती दिली. यावेळी प्रा. महादेव उंदरे यांनी उपस्थितांना एड्स निर्मूलनाची शपथ दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दैवशाला रसाळ यांनी मानले. ही रॅली परिसरातील नागरिकांसाठी जागृतीचा प्रभावी संदेश देणारी ठरली.

 
Top