भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 2 डिंसेबर रोजी सकाळी 7 :30 वाजल्यापासून मतदानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
युवक, युवती,महिला जेष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी भूम शहरातील 21 मतदान केंद्रावर सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत मतदान केले. आलमप्रभू शहर विकास आघाडी व जनशक्ती शहर विकास आघाडीच्या वतीने सर्व बूथवर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. दोन्ही आघाडीकडून इतर गावांना असणाऱ्या मतदारांना साद घातल्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. दोन्ही आघाडीकडून प्रचार जोराचा करण्यात आला होता. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाची निवडणूक चुरशीची झाली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दोन्ही आघाड्याकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यामध्ये पडते. येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी दिसून येणार आहे. मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लाभल्यामुळे कार्यकर्ते ,नेतेमंडळी यांची मात्र पूर्णपणे निराशात झाली असल्याचे पहावयास मिळाले. बाहेर जाऊन आलेले काही कार्यकर्ते मतदार निकालासाठी गावांमध्येच थांबणार होते. मात्र निकाल पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा आली.
