कळंब (प्रतिनिधी)- अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/ एड्स ला लढा देऊ, नव परिवर्तन घडवू" या घोषवाक्यास अनुसरून .डॉ धनंजय चाकूरकर सर जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव, मा. डॉ नागनाथ धर्माधिकारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कळंब , श्री उद्धव कदम जिल्हा कार्यक्रम अधिकारी व श्री महादेव शिनगारे जिल्हा पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली *जागतिक एड्स दिन पंधरवाडा निमित्त आयसीटीसी विभाग उपजिल्हा रुग्णालय कळंब यांच्या वतीने *छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब* व *ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब* येथे जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. माने सर, प्रा.जगताप सर,प्रा. गंभीरे सर, एन एस एस विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. कळसकर मॅडम व मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हेमंत भगवान सर, एन एस एस विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. ताटीपामूल सर, प्रा चांदोरे सर, प्रा महाजन सर , प्रा मुखेडकर मॅडम,अरविंद शिंदे सर व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. तसेच या कालावधीत "रेणुका फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कळंब व योगेश्वरी बीएससी नर्सिंग कॉलेज डिकसळ यांनी कळंब शहरातून एच आय व्ही /एड्स विषयी जनजागृती पर रॅली काढली.
तसेच कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बस स्थानक परिसरात व शहरातील मुख्य रस्त्यावर व रुग्णालय परिसरात एच आय व्ही/ एड्स संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय तसेच मादक द्रव्यांचे सेवन व त्याचे दुष्परिणाम या विषयावर एच आय व्ही एड्स बद्दल पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती केली. या दिनानिमित्त उपस्थित युवक युवतींना एचआयव्ही एड्स बद्दल सविस्तरपणे माहिती देऊन जागतिक एड्स दिनाची शपथ देण्यात आली.
यावेळी रेणुका कॉलेजचे संचालक शरद जाधवर, प्राचार्य जाधवर मॅडम, श्रीमती झांबरे मॅडम , योगेश्वरी बीएससी नर्सिंग कॉलेजचे संचालक श्री महेश इटकर, अर्चना इटकर, हनुमान राठोड (प्राचार्य), अतुल मगर (शिक्षक), ओंकार निंबाळकर (शिक्षक) व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. अशा रीतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ एम यू शेळके , डॉ शरद दशरथ,आयसीटीसी विभागाचे श्रमती प्रगती भंडारी ,श्री परशुराम कोळी , श्री ईश्वर भोसले, रुग्णालयातील तानाजी कदम, शिवशंकर वीर, लक्ष्मीकांत मुंडे व इतर अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
