धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य आणि जोशपूर्ण रॅली काढण्यात आली.
भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग 2 चे उमेदवार अलका प्रकाश पारवे आणि आकाश मधुकरराव तावडे यांच्या प्रचारार्थ गांधीनगर आणि परिसरात काढण्यात आलेली रॅली अत्यंत उत्साहवर्धक ठरली.
रॅलीदरम्यान घोषणाबाजी, संघटनेचा उत्साह आणि नागरिकांचा जबरदस्त सहभाग पाहून संपूर्ण परिसर उत्साहात न्हाऊन निघाला. नागरिकांच्या चेहऱ्यावर विकासाबद्दलची अपेक्षा आणि भाजपा नेतृत्वावरील विश्वास स्पष्ट दिसत होता.
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगत नागरिकांना मतदानाद्वारे विकासाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.
या रॅलीत मधुकर तावडे, नितीन तावडे, अमरसिंह देशमुख, दशरथ पाटील, सतीश घोडेराव, अमोल राजेनिंबाळकर, लक्ष्मण माने, पंकज जाधव,विजय राठोड, विनायक कुलकर्णी यांच्यासह प्रभागातील शेकडो नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय आणि प्रेरणादायी ठरला. आजचा प्रचंड प्रतिसाद हा जनतेचा स्पष्ट संदेश आहे की धाराशिव आता बदलत आहे आणि विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.
