भूम (प्रतिनिधी)-  प्रशालेची विद्यार्थिनी वैष्णवी बाबर हिने निवड चाचण्यांत प्रभावी खेळ, कौशल्य आणि दमदार कामगिरी सादर करत महाराष्ट्रा राज्याच्या कबड्डी संघात अंतिम स्थान मिळवले. महाराष्ट्र शालेय कबड्डी संघात स्थान मिळवणारी वैष्णवी पहिलीच खेळाडू आहे. तिच्या या कामगिरीमुळे धाराशिव जिल्ह्याचा आणि प्रशालेचा अभिमान वाढला असून तिच्या या कामगिरी मागे मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक अमर सुपेकर (कबड्डी कोच) यांचे मोलाचे योगदान आहे. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने वैष्णवी बाबर आणि क्रीडा प्रशिक्षक यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सुळ  मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, खेळाडूंचे आधारवड उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

 
Top