धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.पंजाबराव देशमुख हे संस्कारी शिक्षण आणि शेतकरी कल्याणाचे खरे शिल्पकार आहेत. असे प्रतिपादन डॉ. बालाजी गुंड यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रथम शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, डॉ पंजाबराव देशमुख यांचे पूजन डॉ सी.आर दापके यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.
डॉ. गुंड म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, शिक्षणाची दुरावस्था, ग्रामीण भागातील समस्या यांची जाणीव व अनुभव मोठ्या प्रमाणात त्यांना होता. शेतकरी केवळ शेती करत नाही तर काळ्या मातीत आपला जीव ओततो आहे ही गोष्ट त्यांनी जवळून अनुभवली. शेतकऱ्यांचा विकास हाच देशाचा विकास ही खुणगाठ मनाशी बांधली असे डॉ. गुंड यांनी सांगितले. सदर प्रसंगी डॉ केशव क्षीरसागर,प्रा माधव उगिले, प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा डॉ मंगेश भोसले,प्रा डॉ मोरे, कार्यालयीन अधीक्षक सुमेर कांबळे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
