कळंब (प्रतिनिधी)- नववर्षाची सुरुवात आरोग्यदायी होण्यासाठी स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडी च्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे कळंब मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन होत असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कळंब चे ऐक्य दाखवण्यासाठी आता कळंबकर धावणार आहेत.

गेल्या 7 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रतून स्पर्धक सहभाग नोदवत असतात आता पर्यंत 150 च्या वर नाव नोदणी झाली आहे.

शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-1 येथून स्पर्धां सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लक्ष्मी रोड मार्गे डिकसळ येथील केंब्रिज स्कूल पर्यंत स्पर्धा असणार आहे हे तबल अडीच किलोमिटर अंतर असणार आहे.या बक्षीसाचे प्रायोजक श्री शहीद भगतसिंग गणेश मंडळ व कथले युवक आघाडी  वतीने करण्यात येणार आहे .5 गटा मध्ये ही स्पर्धा होणार आहे तरीही सर्व इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोदणी ऑनलाईन स्वरूपात करावी व 8806869143 यश सुराना या नंबर वर नोदणी करू शकता असे आवाहन स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने करण्यात आले.


5 गटामध्ये ही स्पर्धा होणार 

मॅरेथॉन स्पर्धा ही पाच गटामध्ये होणार गट क्र.1ला 

6 ते 15 वर्ष मुली, गट क्र.2 वय 6 ते 15 वर्ष मुले, गट 3  खुला पुरुष, गट 4खुला महिला, गट 5वा वय 45 च्या पुढील स्पर्धक असून प्रथम, दुतिय, तृतीय बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात येणारं आहे


स्पर्धकांची संख्या वाढणार 

कळंब शहरात मागील आठ वर्षापासून स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी 400  स्पर्धक सहभाग नोदवला होता या वर्षी  संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे आयोजन जोरदार करण्यात येणार आहे तरीही सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे विनंती करण्यात येत आहे.

(बाळासाहेब कथले)

 
Top