कळंब (प्रतिनिधी)- येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दि .25 डिसेंबर रोजी ई - न्यायालयीन प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. 

या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये आयोजन करण्यात आले होते.  या न्यायालयात प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. आर. कुलकर्णी तसेच दुसरे मार्गदर्शक न्यायाधीश श्रीमती ए. डी.  जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यायालयीन प्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमात येणाऱ्या काळात संपूर्ण डाटा ऑनलाइन कसा करावा या विषयावर प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन करण्यात आले.  यात ॲड. एस. आर. आगलावे व ॲड . ए .पी . कोल्हे यांनी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची  प्रस्तावना व आभार प्रदर्शन विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.बी.बी. साठे यांनी केले.तर या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ मंडळी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते.  कार्यक्रम पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top