मुरुम (प्रतिनिधी)- कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम येथील सन 2022-23 मधील विज्ञान शाखेचा माझी विद्यार्थी देवराव मरबे राहणार आलुर याची भारतीय सैन्यदलात ट्रेडमन म्हणून निवड झाल्यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले यांच्या हस्ते त्याचा सत्कार करून सैन्यदलातील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना देवराव मरबे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्वकर्तुत्ववाने यशाचे शिखर गाठले आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी व भारत देशाची सेवा करण्यासाठी आपणही प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले यावेळी महाविद्यालयातील प्रा. राठोड एस. बी., प्रा. उपासे जी. डी., प्रा. इंगोले बी. आर., प्रा. हराळकर आर. व्ही., प्रा. चौगुले, प्रा. चौधरी, प्रा. कांबळे, प्रा. चिकुंद्रे, प्रा. चव्हाण, प्रा. इंगळे, प्रा. शिंदे, श्री गुरव, अनिकेत सगट हे उपस्थित होते.
