मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा जि. धाराशिव येथे राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताह दिना निमित राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. दि 30 नोव्हेंबर हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येत असतो यावेळी एनसीसी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आला.
राष्ट्रीय सायबर सुरक्षा दिनाबद्दल संगणक शास्त्र विभागाचे डॉ भरत शेळके व्याख्याता म्हणून उपस्थित होते. सर्व कॅडेट व विद्यार्थ्यांना त्यांनी 'सायबर हाइजिन' या विषयावर मार्गदर्शन केले. शेळके यांनी आज अशा अनेक प्रमाणात वाढत चाललेल्या घटना घडत आहेत . अशा फसवणुकी संगणक व मोबाईल द्वारा जास्त होत आहेत . त्यामध्ये आर्थिक, वैयक्तिक ,खाजगी माहिती चोरी,फसवणुक केली जात आहे . यासाठी सर्वांनी या बनावट ॲप्स, लिंक, मॅसेज मोबाईल व संगणक द्वारे जास्त प्रमाणात हॅक केली जात आहे याबदल सर्वांनी सुरक्षित रहावे व सर्व मोबाईलच्या माध्यमातुन व्यक्तिची वैयक्तिक माहिती घेऊन हॅकर स्वतःचा ताबा घेतो त्यांच्या संबंधिताना तो फसवत असतो . याबद्दल सर्वांना संकणाकाची साक्षरता जाणुन घेणे गरजेचे आहे असे सरांनी सांगितले. तसेच आज प्रत्येकाने आपला मोबाईल वापरत असताना विविध फसव्या , बनावट जाहिराती, लिंक, मॅसेज पासून सावध रहावे जर फसवणूक झालीच तर वेळीच राष्ट्रीय, राज्य सायबर सुरक्षा, जवळच्या प्रत्येक पोलिस स्टेशनला किंवा संबंधित यंत्रणेला भेट देऊन किंवा फोनदवारे आपली झालेली फसवणूक कळवून सुरक्षित रहावे असे आव्हान केले.राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो. या महिन्यात देशभरात सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात आणि लोकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्याबद्दल माहिती दिली जाते.राष्ट्रीय सायबर सुरक्षा ज्याचा उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संजय अस्वले होते सूत्रसंचलन ,प्रास्तविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी केले आभार कॅडेट प्रमोद सुनगार यांनी केले या कार्यक्रमास डॉ विलास इंगळे, डॉ.पदमाकर पिटले डॉ प्रदीप पाटील,प्राध्यापक, कॅडेटस, विद्यार्थी उपस्थित होते.
