धाराशिव (प्रतिनिधी)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुक - 2025 ची आदर्श आचारसंहितेचे आदेश 4 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्यामुळे आदर्श आचार संहिता 4 नोव्हेंबरपासुन ते 3 डिसेंबर 2025 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुक 2025 ची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत लागु राहणार राहणार आहे.त्याअनुषंगाने सर्व कार्यालय विभाग प्रमुख तसेच सर्व नागरिक यांना कळविण्यात येते की,ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही. त्यामुळे 1 डिसेंबर 2025 रोजीचा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.