उमरगा (प्रतिनिधी)-  नगरपालिका निवडणुकीत शहरातील 37 मतदान केंद्रावर उमरगा नगरपालिका निवडणुकीत 66.81 टक्के मतदान झाले आहे. 21 हजार 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 11 हजार 35 पुरुष तर 10 हजार 200 महिलांचा व इतर 4 जणांचा समावेश आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 4 तर 12 प्रभागातील 25 जागेसाठी 90 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी तीन जागेवरील 12 उमेदवारांच्या निवडणुकीला आयोगाने स्थगिती दिली आहे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेविकांच्या 22 जागेसाठीच्या 78 उमेदवारांच्या अतितटीच्या तिरंगी निवडणुकीत 82 जणांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे.

उमरगा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 12 प्रभागातील 25 जागेसाठी 90 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी प्रभाग 4 (ब), 7 (अ) व 11 (अ) या तीन प्रभागातील 12 उमेदवारांचे निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे नगरसेविकांच्या 22 जागेसाठीच्या 78 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. मंगळवारी (दि.2) शहरातील 31 हजार 791 मतदानापैकी 37 मतदान केंद्रावर 66.81 टक्के मतदान झाले आहे. 21 हजार 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 11 हजार 35 पुरुष तर 10 हजार 200 महिलांचा व इतर 4 जणांचा समावेश आहे.

प्रचाराच्या काळात शिवसेनेने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची शिवसेना (ठाकरे) कडून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभातून निवडणूकीत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना आत्मविश्वास आसल्याने स्वतःच्या बळावर कॉर्नर बैठका व गाठीभेटी वर भर देत शेवटच्या दिवशी माजी मंत्री बसवराज पाटील व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सभेतून निवडणूक प्रचारात रान पेटवले. मंगळवारी सकाळी 7.30 पासुन मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी वयस्क, अपंग, आजारी मतदारांना घरी जाऊन गाडीत घेऊन येत होते.

 
Top