धाराशिव (प्रतिनिधी)- येथील धाराशिव आकाशवाणी केंद्र 30 व्या वर्धापनदिनी धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेली दैनंदिनी आकाशवाणी केंद्राचे सन 1996 चे निवेदक तथा संस्कार भारतीचे कला साधक धनंजय कुलकर्णी देवगिरी प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, शरद वडगावकर, संगिता पाटील, रवी पिसे यांच्या हस्ते धाराशिव आकाशवाणी केंद्र कार्यक्रम प्रमुख किशोर पवार, निवेदक दौलत निपाणीकर यांचेकडे सुपुर्द करण्यात आली. या प्रसंगी आकाशवाणी केंद्रात कार्यरत निवेदक, कर्मचारी वृंद, असंख्य श्रोते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

 
Top