धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिवमार्फत दरमहा तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते.मात्र नगरपरिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार, दि.2 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्याने, उमरगा येथे नियोजित असलेले शिबीर कार्यालय प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे.

उमरगा येथे हे शिबीर आता 23 डिसेंबर 2025 रोजी पूर्वनियोजित ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.सर्व नागरिकांनी व वाहनधारकांनी या बदलाची नोंद घ्यावी असे धाराशिवचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी कळविले आहे.


 
Top