धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्ष व निवडणुकीच्या वातावरणात मतदार जनजागृती म्हणुन संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या. संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस वंदन करण्यात आले. मतदार जनजागरण समितीच्या आयोजित संविधान जनजागृती रॅलीतील मान्यवरांचा यावेळी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, मार्गदर्शक बलभीम कांबळे,सदस्य अतुल लष्करे, विशाल घरबुडवे, मुकेश मोटे,तसेच मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ, सहसचिव बाबासाहेब गुळीग, कोषाध्यक्ष शेख रौफ, उपाध्यक्ष सचिन चौधरी, कायदेसल्लागार ॲड.अजय वाघाळे, सदस्य अमर आगळे, विकास विधाते, तर किसन घरबुडवे, अशोक बनसोडे, डावखरे, सरफराज पटेल, पुरातत्वज्ञ रविंद्र शिंदे, ॲड.पायाळयांची विशेष उपस्थिती होती. सुत्रसंचलन बलभीम कांबळे यांनी केले. तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.
