वाशी (प्रतिनिधी)- दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मवीर  महाविद्यालयामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.बी.कदम होते. संविधान दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वरिष्ठ विभाग एन.एस.एस व ज्युनिअर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 

प्राचार्य डॉ.ए बी कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संविधानाचे महत्त्व लोकशाही ,राष्ट्रभक्ती याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्यामसुंदर डोके,सूत्रसंचालन सुनिल आवारे सर तर संविधानातील उद्देशिकेचे वाचन अजित तिकटे सर आणि आभार मिलिंद शिंदे सर यांनी मानले.


 
Top