तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मंत्रीमंडळ मतदान पद्धतीने घेऊन मुख्यमंत्रीपदी सिद्धी भोरे हीची निवड झाली आहे. प्रशालेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान घेऊन मंत्रिमंडळाची निवड केलेली आहे.यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्य, स्वच्छता, अभ्यास, क्रीडा, सांस्कृतिक मंत्री यांसारखी विविध मंत्रीपदे आहेत. विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि लोकशाही मूल्यांची शिकवण देणे हे मुख्य उद्दिष्ट आहेत.

मंत्रीमंडळाची कार्ये आणि जबाबदाऱ्या:-शाळेच्या दैनंदिन कामकाजात मदत करणे.,शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीत सहभाग घेणे., शाळेची स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी काम करणे.,शालेय विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे.,विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचना शासनापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. निवडणूक प्रमुख म्हणून शाळेचे मुख्याध्यापक  पी. एस. खडके यांनी काम पाहिले.निवडणूक सुव्यवस्थीत व्हावी म्हणुन आर. एम. जाधवर ,पी.एच.पडवळ, एस. ए‌.सलगर, जे. आर.बुकन यांनी परीश्रम घेतले.


मंत्रीमंडळाने घेतलेली शपथ- आम्ही सर्व मंत्री म्हणून, शाळेच्या मंत्रिमंडळात आमच्यावर सोपवलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडू."“शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही काम करू.” किंवा “शाळेच्या नियमांचे आणि नियमांचे पालन करु.                               


 मंत्रीमंडळ:-मुख्यमंत्री  सिद्धी अविनाश भोरे,उपमुख्यमंत्री  नबी लतीफ शेख, सहल मंत्री ओम शरद विठूबोणे,क्रीडामंत्री अनुष्का ईश्वरनागलबोणे,

अर्थमंत्री शितल नाना आवले, शिक्षण मंत्री अन्नपूर्णा बंडू विठूबोणे,आरोग्य मंत्री श्रद्धा ज्ञानेश्वर भोसले,सांस्कृतिक मंत्री सिद्धांत नवनाथ कचार यांची मतदान घेऊन निवड करण्यात आली.

 
Top