धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने  एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 11 नोव्हेंबर 25 रोजी करण्यात आले. 

विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लातूर व पुणे शाखेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष बोडके यांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख  प्रा.शितल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना “ बी आय एम सॉफ्टवेअर, ई- टेंडरिंग व बिल्डिंग परमिशन  या स्थापत्य अभियांत्रिकी मधील प्रमुख विषयांवर विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम क्षेत्रात होणारे बदल, डिजिटल साधनांचे महत्त्व आणि सॉफ्टवेअरच्या प्रत्यक्ष वापराबाबत सविस्तर सादरीकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या सत्राचा मनःपूर्वक लाभ घेतला व त्यांच्या शंकांचे निरसनही केले. त्यामुळे या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना रुची निर्माण झाली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला, असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले. या अंतर्गत सिव्हिल अभियांत्रिकी विषया अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागातील (बांधकाम व्यवसायातील) बारकावे माहिती जाणून घेतले. सोबतच विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लातूर व पुणे आणि अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव यांच्या मध्ये भविष्यातील नोकरी संदर्भ आणि ट्रेनिंग संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यशाळेसाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top