मुरुम (प्रतिनिधी)- विधी व सेवा दिन हा केवळ औपचारिक दिवस नाही, तर लोकशाहीचा आत्मा जागवणारा दिवस आहे. न्याय ही केवळ कागदावरची संकल्पना नाही ;तर ती प्रत्येक नागरिकाचा श्वास बनावी, तसेच विधी व सेवा दिनाचे उद्देश एनसीसी च्या विद्यार्थ्यांना लातूर विधी सेवेचे न्यायाधीश व्यंकटेश गिरवलकर यांनी सांगितले. श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात संपन्न झालेल्या 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नरसिंग वाघमोडे, कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष नौगण , ॲडम ऑफिसर कर्नल वाय.बी. सिंह , राजस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण खरोसेकर,चीफ ऑफिसर महावीर काळे , सेकंड ऑफिसर नमनगे जगदीश, सचिन गिरवलकर, सुभेदार मेजर शंभू सिंग यांची उपस्थिती होती.
न्यायव्यवस्थेला लोकपार्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी 9 नोव्हेंबरला विधी व सेवा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. नरसिंग वाघमोडे यांनी ' भारतीय राज्यघटना आणि तिची निर्मिती प्रक्रिया ' या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना त्याचा दुरुपयोग होऊ नये, संविधानाची पायमल्ली म्हणजे आपल्या लोकशाहीवरचा घाला आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे डॉ. वाघमोडे म्हणाले.
या कार्यक्रमास यशवंत विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय , ज्ञानेश्वर विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीच एम शिवशंकर निकम, हवालदार संभाजी शिंदे, हवालदार दीपक, हवालदार अमोल मोरे, हवालदार शामराव सोनटक्के यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चीफ ऑफिसर महावीर काळे यांनी केले तर आभार जगदीश नमनगे यांनी मानले.
