धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आणि ऑर्किड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अंतर महाविद्यालय जलतरण स्पर्धेत धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी पांडुरंग रणखांब हिने 100 मीटर फ्रीस्टाइल मध्ये प्रथम क्रमांक व 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. श्रावणी व्हि. आर. जलतरण तलाव मध्ये रोजचा सराव करते. श्रावणीचा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग असून, श्रावणी वयाच्या अकरा वर्षाची असल्यापासून तिने जलतरणाचा सराव सुरू केला. तिने खाडी समुद्री स्पर्धेत सुद्धा यश मिळवलेले आहे. तिला महाविद्यालयाचे डॉ.प्रा.विक्रमसिंह माने यांनी श्रावणीला वेळोवेळी मार्गदर्शन केले.

 याप्रसंगी श्रावणीचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच त्यांचे करिअर उत्तम पद्धतीने घडावे म्हणून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कौशल्यावर आधारित अनेक कोर्सेसवर फोकस केला जातो. आमच्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलींसाठी अत्यंत सुरक्षित असे वातावरण असून खेळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवावे म्हणून अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न महाविद्यालय सातत्यपूर्ण करत आहे.

स्पोर्ट्स  इन्चार्ज प्रा. आर. एम.शेख यांचेही विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. प्रथम वर्ष विभागाच्या विभागप्रमुख श्रावणी ही तेराणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आहे जिने जलतरण स्पर्धेत क्रमांक पटकावलेला आहे. या यशाबद्दल  तेरणा ट्रस्टच्या प्रशासनाने, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, विभागप्रमुख डॉ. उषा वडने व प्रा. आर. एम. शेख यांच्या सह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्रावणीचे कौतुक केले.


 
Top