धाराशिव (प्रतिनिधी)- मेरी झांसी नही दुंगी म्हणून आपला स्वतःचा प्रांत झासी वाचवण्यासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी जो प्रखर लढा दिला. त्या लढाईची नोंद इतिहासाने घेतली. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे हे साहस, स्वाभिमान आणि त्यांचे असलेले धोरण. चतुरता, युद्धशास्त्र निपुणता प्रत्येक स्त्रीने या गोष्टींकडे अभ्यासपूर्ण पाहिले पाहिजे. असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बेसिक सायन्स अँड ह्युमिनिटीज विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. उषा वडणे चौगुले यांनी केले.
झाशीच्या राणीच्या जयंती निमित्त तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.या अभिवादनाच्या कार्यक्रमाला प्रा. सुनीता गुंजाळ, प्रा.वर्षा पाटील, सविता नलावडे,बिभीषण सिरसट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रथम वर्ष इंजीनियरिंगचे विद्यार्थी अक्षय माळी, सम्राट क्षीरसागर, हर्ष घुगे, जाधव स्वरुप, पृथ्वीराज गायकवाड, सत्यम पाटील, अभय वाघचौरे, ओंकार कुंभार या विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
