तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस व इतर साहित्य शाॅक सकीऺटमुळे जळाल्याने तीन लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले.

तेर येथील नामदेव थोडसरे यांच्या गट नंबर ५७८ मधील २ एकर ऊस,स्पिंकलर सटचे पाईप,ऊसातील ड्रीपच्या नळ्या शाॅक सकीऺटमुळे जळून जवळपास तीन लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले.ही घटना ११ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता घडली.याबाबत तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख यांनी पंचनामा केला आहे.

 
Top