मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील विद्यार्थ्याने धाराशिव येथे पार पडलेल्या मैदानी स्पर्धेत एकूण 18 पदके प्राप्त करून जिल्ह्याचे 'जनरल चॅम्पियनशिप'पदक खेचून आणले. यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी मुलांना प्रमाणपत्र व पदक देऊन त्यांचा गौरव करुण मार्गदर्शन केले . सरांना यावेळी विद्यार्थ्यांना केवळ जिल्ह्यात नव्हे तर विद्यार्थ्यांनी मेहनत, कष्ट व जिद्दीच्या बळावर राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करावे तसेच विद्यार्थ्यांना खेळात चालना मिळावी यासाठी केंद्र शासनाने खेलो इंडिया या स्पर्धा आयोजित केल्या आहे तरी जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा व आपले खेळामध्ये नावलौकिक कमवावे असे आव्हान यावेळी केले. या सत्कार कार्यक्रमासाठी डॉ विलास इंगळे, खेळ विषयाचे विभाग प्रमुख प्रा विजय पवार डॉ राजू सूर्यवंशी, प्रा गोविंद गायकवाड कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, प्रा शैलेश महामुनी, राजकुमार सोनवणे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. विजेते खेळाडु
भोसले नामदेव धावणे 5 कि मिटर प्रथम, पुजारी प्रथमेश 800 मिटर प्रथम व 10 किमी . द्वितीय ' रिले मुले प्रथम 4 X 400 झंपले सिद्धु , सास्तुरे किरण ,बनसोडे आकाश , हाके प्रशांत, जमादार कृष्णा लांबऊडी प्रथम, प्रेमनाथ जमादार भाला फेक द्वितीय , होगाडे चंदाप्पा 5 किमी द्वितीय, हाके प्रशांत 100,200 मि द्वितीय
झंपले सिद्धू 1500 मीटर तृतीय , शेख सानिया 100 मीटर प्रथम व लांब ऊडी प्रथम ,जमादार राधा गोळा फेक द्वितीय मम्माळे राधिका 200 मी व 400 मी द्वितीय, रिले मुली 4x 400 जमादार राधा, मम्माळे राधिका,शेख सानिया सुर्यवंशी राजनंदिनी प्रथम व 5 किमी,10 किमी द्वितीय प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त करून सर्वसाधारण विजेते पद प्राप्त केले. या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
