धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण वाचन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. मोबाईलमुळे इंटरनेटच्या युगात आज वाचन कमी झाले असले तरी मानवी जीवनात पुस्तकांचे महत्त्व फार महत्वाचे आहे ते कधीच कमी होणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम हे अजरामर व्यक्तीमत्त्व पुस्तक वाचनामुळेच घडली आहेत. तेंव्हा धाराशिवमधील जेष्ठ नागरिकांनी या योजनेच्या जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख डॉ. मदनसिंग गोलवाल यांनी केले. आमच्या महाविद्यालयातील ग्रंथालयात 01 लाख ग्रंथाची संख्या आहे. त्यात संदर्भ ग्रंथ आहेत. विविध विषयावरील ग्रंथ आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. सकाळी 10.30 ते 5 वाजेपर्यंत जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, ही योजना मोफत चालविली जात आहे. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे.
या योजनेची माहिती घेण्यासाठी धाराशिवमधील जेष्ठ नागरिक, वाचक, साहित्यिक इतिहास संशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र धावारे, कवी प्रभाकर बनसोडे यांचे मदनसिंग गोलवाल यांनी महाविद्यालयाची माहिती पुस्तिका व स्मरणिका देवून स्वागत केले. ग्रंथालयातील ग्रंथाची माहिती दिली. यावेळी अत्तार शेख, शिवराज राजे गोरे, प्रथमेश भोसले इत्यादींची उपस्थिती होती.
