तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तिरुपती चा विकास वीस वर्षात झाला तसा सर्व बाजूंनी सर्वांगीण विकास तीर्थक्षेत्र तुळजापुरात दहा वर्षात करावयाचा माझा संकल्प असल्याने विधानसभेपेक्षा दुप्पट मताने नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार विनोद गंगणे व त्यांच्या 22 नगरसेवकांना निवडून द्या विकासाची हमी मी घेतो. असे प्रतिपादन नगरपरिषद निवडणूक भाजपा उमेदवार प्रचाराचा शुभारंभ करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. 

भाजपा उमेदवार प्रचाराचा शुभारंभ पार्श्वभूमीवर गोलाई चौकातून रॅली रॅली काढण्यात आली. सदरील रॅली श्री तुळजाभवानी मंदिर महाडवार परिसरात आल्यानंतर येथे श्री तुळजाभवानी मातेची आरती करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुनील चव्हाण, माजी नगराध्यक्ष अर्चनाताई गंगणे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे व बिनविरोध निवडून आलेल्या डॉक्टर अनुजा कदम सह 22 उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, महंत इच्छागिरी महाराज यांना बिनविरोध काढण्याची चर्चा झाली. या प्रकरणी खोटे नाते बोलू नका. याबाबतच म्हणतच बोलतील असे यावेळी म्हणाले. तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे मार्गावर येण्यासाठी तीन हजार 295 कोटी रुपये देऊन दिला निधी दिला. सध्या काम प्रगतीपथावर आहे. मंदिर परिसर विकासासाठी 1865 कोटी रुपये निधी मंजूर केला असून भाविकांना चांगले दर्शन सुविधा मिळावी. शहरवासी चे उत्पन्नात दुप्पट वाढवावी. हे शहर विकासासाठी आमचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी म्हणाले. तीर्थक्षेत्र तुळजापूर विकासासाठी विरोधकांनी एक रुपया तरी दिला का असा सवाल करून जय भवानी जय शिवाजी कुठल्या तोंडाने म्हणतात अशी टीका केली. माझ्यावर वैयक्तिक खोटे नातेवाला तर सहन करणार नाही. सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. मला बोलायला लावू नका, बोलायचं तर विकासावर बोला असे आव्हान यावेळी विरोधकांना दिले. तीर्थक्षेत्र तुळजापुरात विकास कामे करताना स्थानिकांवर अन्याय होऊ न देणारा असल्याचे स्पष्ट केले. 

यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे म्हणाले की, तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकास आपल्याला आमदार राहणार माध्यमातून करावयाचा असल्याने नगरपरिषद निवडणुकीत आम्हाला विजयी करा. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर असाच राहू द्या. असे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कंदले यांनी केले. त्यानंतर सदरील रॅली शुक्रवार पेठ, पावणारा गणपती चौक, कमान वेस, आर्य चौक मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ विसर्जित झाली. या रॅलीत महिला व लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड होती.


 
Top