धाराशिव (प्रतिनिधी)-  तेर येथे वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस, बीएएमएस तसेच बीडीएस साठी यावर्षी प्रवेशास पात्र असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार करून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

तेरे येथील वैष्णवी काकासाहेब देवकते, श्रुती गोरोबा सुतार, ओंकार राजेंद्र धुमाळ, वैष्णव दत्ता बनसोडे, प्रणाली बबन कोकरे, आकाश अभिमान कोकरे, मयूर जितेंद्र दीक्षित, आरती नानासाहेब बीटे, श्वेता अभिमान राऊत हे नऊ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरले असल्याने सौ.अर्चनाताई पाटील यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांचे मनोभावे कौतुक केले व या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले तसेच या पुढील काळात आणखी कोणत्याही स्वरूपाची अडचण पडल्यास त्यासाठी कधीही मदत करायला तयार आहे असा शब्द दिला. तसेच यापुढे देखील तेर येथील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्यास कै. चंद्रकलादेवी पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना प्रत्येकी एक लाख बक्षीस जाहीर केले.

या कार्यक्रमासाठी गोरोबा पाडुळे,बालाजी पांढरे, सचिन देवकते, इंद्रजीत कोळपे, अनिल टेळे, भुजंग खांडेकर, रमेश लकडे यांनी पुढाकार घेतला.

यावेळी श्री.दत्ता देवळकर, श्रीमंत फंड, नवनाथ नाईकवाडी, सचिन देवकाते, प्रा. सोमनाथ लांडगे,  गोरोबा पाडोळे, राम जवान, माधवी लकडे, बेद्रे, अनिल टेळे, हनुमंत कोळपे, नवनाथ पसारे, सुधाकर फासे, अजित कदम, सुमेध वाघमारे, इर्शाद मुलाणी, राम कोळी, संजय लोमटे, काका माळी, बनसोडे, रमेश लकडे, नानासाहेब बीटे, सोमनाथ फासे याशिवाय गावातील असंख्य महिला व असंख्य पुरुष मंडळी उपस्थित होते.

 
Top