तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पादुकांची व पंढरपूर येथील विठ्ठल, रूक्मिणीची 4 नोव्हेंबरला भेट झाली.

तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरला भाऊबीजेच्या दिवशी मार्गस्थ झाली.पालखी पंढरपूरला 1 नोव्हेंबरला पोहोचली.4 नोव्हेंबरला सकाळी श्री संत गोरोबा काका यांच्या पादुका पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात नेण्यात आल्या.यानंतर श्री संत गोरोबा काका यांच्या पादुकांची विठ्ठल व रूक्मिणीची भेट झाली. हा आनंददायी क्षण पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे,संजय जाधव,गोपाळ थोडसरे उपस्थित होते.

 
Top