भूम (प्रतिनिधी)- तालूक्यातील माणकेश्वर येथील आर्या पोपट उमाप हिने क्रिकेट क्षेत्रात उतुंग भरारी घेत बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट सामण्यात 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघात. तसेच त्यानंतर 23 वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टी 20 सामन्यासाठी तिचा महाराष्ट्र संघात समावेश करण्यात आला होता. सध्या 23 वर्षाखालील महाराष्ट्र संघात परत तिची निवड करण्यात आली आहे.
मुळ गाव माणकेश्वर येथील व सध्या शिक्षक व वडीलांच्या नोकरी साठी सोलापूर येेथे वास्तव्यास असलेल्या आर्याने क्रिकेटची सुरुवात जून 2021 पासून केली. वडीलांना क्रिकेटचा नाद आसल्याणे क्रिकेटचे पूर्ण प्रशिक्षण तिला तिचे वडील पोपट उमाप यांच्या कडूण मिळत आहे.. तिचे वडील श्री पोपट उमाप हे नियमितपणे तिचा 5 ते 6 तास सराव घेतात. खेळाची जिद्द, भरपूर मेहनत, वडिलांचे प्रशिक्षण आणि कुटुंबाचं पाठबळ याच्या जोरावर तिने खूप कमी कालावधीत क्रीकेट मोठे यश संपादन केले आहे. 2023 मध्ये 15 वर्षाखालील महाराष्ट्र संघात,2024 मध्ये 17 वर्षाखालील महाराष्ट्र संघात आणि यावर्षी म्हणजे 2025 मध्ये 19 वर्षाखालील व 23 वर्षाखालील महाराष्ट्र संघात तिचा एष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
आर्या आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 177 सामने खेळले असून, त्यामध्ये तिने 5000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामध्ये तिची नाबाद 151 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सलामीची फलंदाज म्हणून ओळखली जाणारी आर्या उत्कृष्ट यष्टीरक्षक पण आहे. यष्टीरक्षण करताना आजपर्यंत तिने 178 फलंदाज बाद केले आहेत. आर्याच्या या यशाबद्दल माणकेश्वर मधील ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून, तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
