भुम (प्रतिनिधी)-  चोरी केलेल्या दुचाकीला दुस-या व्यक्तीच्या नावे असलेल्या दुचाकीच्या नंबरची प्लेट लावून चोरी करीत असताना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने तीन चोरट्यांना रंगेहात पकडून चोरलेली दुचाकी जप्त केली आहे. सदरची घटना दि. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर धूळे राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर शिवारतील साहील पेट्रोल पंपावर घडली असून तीन जणांच्या विरोधात पोका. अमोल शिवाजी गोडगे यांचे तक्रारीवरून वाशी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  दि. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रोहित युवराज ओव्हाळ, साहिल जब्बार शेख, अमीर अन्वर शेख सर्व रा. भूम ता. भूम जि. धाराशिव यानी त्याचे कडील शाईन कंपनीची काळया रंगाची दुचाकी जीचा चेसिस नं. 4657070204 इजीन नं. 6572108255 या चोरी केलेल्या दुचाकीला गुन्हा करण्याचे उद्देशाने धनराज गौतम चेडे रा. वाशी यांचे नावे आर टी ओ धाराशिव मध्य नोंद असलेल्या दुचाकी क्र. एम एच 25 ए एम 5456 या  दुचाकीच्या क्रमांकाची नंबर प्लेट तयार करून चोरलेल्या दुचाकीला बसवून चो-या करण्याच्या उद्देशाने धनराज चेडे याचा  मानसन्मान नाव लौकिकास बाधा निर्माण हाईल असे कृत्य करून फसवणुक केली व मौजे इंदापुर शिवारातील साहिल पेट्रोल पंपामध्ये लावण्यात आलेल्या मोटारसायकल मधील पेट्रोल चोरी करत असताना तीघे इसम मिळुन आल्याने त्याचे विरुद फिर्यादी यांची भा. न्या. सं. कलम 318 (2), 336 (3), 336 (4), 303 (2), 3 (5) नुसार फिर्यादीनुसार पोनि शंकर शिंदे यांचे आदेशावरून दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका बाबा जाधवर हे करीत आहेत.

 
Top