धाराशिव (प्रतिनिधी)- हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड जवळा खुर्द कळंब यांचा बॉयलर अग्नी प्रतिपादन समारंभ व ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ 7 नोव्हेंबर 2025 रोजी हभप. प्रकाश बोधले महाराज यांच्या शुभहस्ते व परिसरातील सर्व शेतकरी बांधव, वाहतूक तोडणी ठेकेदार व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ आदित्य पाटील, सुभाष कल्याणकर, साहेबरावर देशमुख, सुभाष देशमुख, अमोल पाटील सरपंच खामसवाडी, राजाभाऊ मुंडे, पप्पू मुंडे, विजय देशमुख, साखरे आप्पा, अमरसिंह देशमुख, सोमेश बगॅस सर्वेसर्वा मालकरी,अमोल शेळके, तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी भागातील शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आदित्य पाटील बोलताना म्हणाले की, पंधराव्या दिवशी सर्व शेतकऱ्यांचे बिले काढण्याचा आमचा मानस आहे. याप्रसंगी बोलताना हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील हणाले की जिल्ह्यातील सर्व गुळ फॅक्टरी जे भाव देतील तोच भाव मीही या ठिकाणी देणार आहे. हातलाई शुगर यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व ऊस वाढीसाठी एआय एप्लीकेशन द्वारे प्रशिक्षण देणार आहेत.  चेअरमन साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवत तीन लाख टन गाळप यावर्षी करण्याचा मानस देखील व्यक्त केला. हे जे युनिट या ठिकाणी अण्णांनी मला काढण्यासाठी सांगितले त्याचं एकच ध्येय होतं की या भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. अशाप्रकारे कारखान्याच्या मोळीपूजन चा कार्यक्रम पार पडला.

 
Top