धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर  धाराशिव येथे राष्ट्रीय सेवा योजना व शासकीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदरील शिबीराचे आयोजन विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.  डॉ. पी. पी. दीक्षित यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सदरील शिबिराच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये चोवीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील दीपमाला करंडे (रक्त संक्रमण अधिकारी), निलाक्षी जानराव (रक्तपेढी तंत्रज्ञ), विनय कुंभार (रक्तपेढी तंत्रज्ञ), गणेश साळुंके  (वैद्यकीय समाजसेवक), जयदेव सुरवसे (रुग्णवाहीका चालक), रविराज गंभीरे (रक्तपेढी परिचारक) यांनी रक्त संकलणाचे कार्य पार पाडले. सदरील रक्तदान शिबिरामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच धाराशिव येथील प्रदीप खामकर, अमोल माने, रविंद्र बेदमूथा व महेश भोंग या नियमित रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. के. पाटील, डॉ. आर. एम. खोब्रागडे, डॉ. जे. एस. शिंदे, तसेच रासेयो स्वयंसेवकानी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 
Top