धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र विशेष यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच आगामी काळातील निवडणुका दरम्यान पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. 

मिटींगच्या वेळी मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्ती जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. तसेच उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंगच्या वेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हावलदार दत्तात्रय राठोड, शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दयानंद गादेकर, मपोह शोभा बांगर, चालक पोलीस हावलदार सुभाष चौरे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी पोस्टे मुरुम, चाळीसगाव जि.जळगाव या दोन रस्त्यावर जॅक टाकून दरोड्याच्या गुन्हयात 27 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला. पोलिस स्टेशन नळदुर्ग येथीलं गुन्हयात 04 आरोपी अटक करून त्यांचेकडून कि 1.452 किलो, वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1 कोटी 75 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोस्टे नळदुर्ग यांनी खुनाच्या गुन्हयात आरोपीस अटक करून अतिशय क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणल्याने त्यांचे  वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक करुन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मिटींगला धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.


 
Top