धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील सामाजिक संघटना शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सन 2025-26 या वर्षाकरिता धाराशिव जिल्हा व धाराशिव शहर कार्यकारिणींची निवड करण्यात आली.यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी अमोल सिरसट तर शहराध्यक्षपदी संतोष घोरपडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
काल झालेल्या समितीच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये सर्वानुमते या निवडीत जिल्हा उपाध्यक्षपदी हनुमंत यादव, सचिव श्रआकाश भोसले, कार्याध्यक्ष मनोज मोरे, सहकार्याध्यक्ष अमोल साळुंके, संघटक सतीश थोरात, सहसंघटक सचिन उमाप, कोषाध्यक्ष सचिन पाटील, सहकोषाध्यक्ष राजेंद्र मोरे, प्रवक्ता राहुल घोडके, सहप्रवक्ता अविनाश अंधारे, प्रसिद्धी प्रमुख लहू शिंदे, सहप्रसिद्धी प्रमुख विशाल घोडके, सोशल मीडिया महेश कळमकर, विनोद कावळे तर कायदेशीर सल्लागार पदी अड. जयप्रकाश साळुंके यांची निवड करण्यात आली.तर धाराशिव शहर कार्यकारिणी मध्ये शहराध्यक्षपदी श्री संतोष घोरपडे, उपाध्यक्ष श्रभैरवनाथ रणखांब, सचिव ऋषिकेश काळे,कार्याध्यक्ष अविनाश रणखांब,सहकार्याध्यक्ष उदय गायकवाड, संघटक प्रथमेश जगदाळे, सह संघटक आदित्य मुंडे, कोषाध्यक्ष अनंत झाडके, सहकोषाध्यक्ष लखन क्षीरसागर, प्रवक्ता रामानंद माडेकर, सहप्रवक्ता केदार जाधव, प्रसिद्धीप्रमुख योगेश रायबान, सहप्रसिद्धीप्रमुख अनिल अंकुश, सोशल मीडिया सुजित मगर, प्रदीप लोमटे तर कायदेशीर सल्लागार पदी अड. महेश गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला.
