धाराशिव (प्रतिनिधी)-  केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025 अंतर्गत सोयाबीन,मूग व उडीद या पिकांसाठी अनुक्रमे 5328रुपये, 8768 रुपये आणि 7800 रुपये प्रति क्विंटल अशी आधारभूत किंमत घोषित केलेली आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील 31 खरेदी केंद्रांवर 15 नोव्हेंबर 2025 पासून प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात होत आहे.

शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित खरेदी केंद्रांवर सुरू झाली असून,नोंदणीसाठी आधारकार्ड, अद्यावत बँक पासबुक,तसेच खरीप 2025 चा ई-पीक पाहणी नोंद असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे घेऊन कार्यालयीन वेळेत  पोर्टलवरील  मशिनवर स्वतःची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना शेतमाल केंद्रावर आणण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक दिवस आधी पाठविण्यात येईल. हा प्राप्त झाल्यानंतर त्या दिवशी शेतमाल केंद्रावर आणणे आवश्यक राहील.


जिल्ह्यातील 31 खरेदी केंद्रांची यादी ही तालुका, खरेदी केंद्राचे नाव आणि सब एजंट संस्थेचे नाव धाराशिव तालुका- धाराशिव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ,धाराशिव,टाकळी (बें) - विकास कृषी पणन सहकारी संस्था,म.धाराशिव,चिखली - वसुंधरा जिल्हा कृषी पणन व प्रक्रिया सहकारी संस्था,कनगरा,ढोकी - पुण्यश्लोक राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,म.ढोकी,गोवर्धनवाडी - पवनराजे ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,खामगाव - गणराज ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. 

तुळजापूर तालुका- तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी संघ, म.तुळजापूर,नळदुर्ग - श्री खंडोबा पणन सहकारी संस्था,म.अणदूर

लोहारा तालुका- कानेगाव - जगदंबा सहकारी खरेदी विक्री संस्था,म.लोहारा,दस्तापुर - दस्तापुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,म. दस्तापुर,बेंडकाळ - एन.एन.जी.ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.

उमरगा तालुका- गुंजोटी - गुंजोटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,गुंजोटी,उमरगा - श्री स्वामी समर्थ सर्व सेवा सहकारी संस्था, म.गुंजोटी,नारंगवाडी पाटी - श्रीयोग फार्मर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,

कळंब तालुका- कळंब - एकता खरेदी विक्री संस्था, म. धाराशिव,शिराढोण - तालुका सहकारी खरेदी विक्री संघ,म.कळंब,चोराखळी - राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,म.चोराखळी,गौर - भैरवनाथ किसन कृषी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,हासेगाव (के) - ॲग्रोवेट ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.

वाशी तालुका- वाशी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ,म. वाशी, पारा, कळंब तालुका भाजीपाला फळबाग उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था,कवडेवाडी - अंजिक्य ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि.,

भूम तालुका- भूम तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ,म.भूम,ईट - तनुजा महिला शेतीपुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,म.सोन्नेवाडी, सोन्नेवाडी - कै.उत्तमराव सौन्ने कृषिमाल पुरक सहकारी संस्था,म.सोन्नेवाडी,पाथ्रुड - कामधेनु कृषिमाल सेवा व विविध व्यवसायीक सहकारी संस्था,गिरवली फाटा - कृषीवाणी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यासह धाराशिव,तुळजापूर,उमरगा आणि कळंब येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हे खरेदी केंद्र सुरू आहेत.


एफ ए क्यू दर्जा व अटी

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केंद्रावर फक्त दर्जाचाच माल स्वीकारला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ, चाळणी करून आणावा.


जिल्हास्तरीय दक्षता पथक:

अप्पर जिल्हाधिकारी  अध्यक्ष,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य,स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी (पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी)  सदस्य,जिल्हा उपनिबंधक  सदस्य सचिव आहे.


तालुकास्तरीय दक्षता पथक:

तहसिलदार  अध्यक्ष,तालुका कृषी अधिकारी  सदस्य,स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे प्रतिनिधी  सदस्य, सहाय्यक निबंधक  सदस्य सचिव हे आहेत. खरेदी प्रक्रियेशी संबंधित अडचणींसाठी केंद्र शासनाने हेल्पलाईन क्रमांक 1800-210-1222 उपलब्ध करून दिला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नोंदणी करून आपल्या शेतमालाची विक्री करावी,असे आवाहन जिल्हास्तरीय दक्षता पथकाच्या अध्यक्षा तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी केले आहे.


 
Top