धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी प्रभाग, आरक्षण व उमेदवार निहाय अधिकृत उमेदवाराचे फॉर्म आज रोजी दाखल करण्यात आले आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी संगिता सोमनाथ गुरव  यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर प्रभागनिहाय उमेदवार शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीमधून फुटून स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीमध्येही  मतभेद झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने व भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्षपदासाठी जाहीर केले आहेत. 

धाराशिव नगराध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता असून, जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मदभेद झाल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता वाढली आहे. धाराशिव नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उबाठा गटाच्यावतीने संगिता सोमनाथ गुरव यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट माजी उपनराध्यक्ष खलिफा कुरेशी यांच्या पत्नी परवीन कुरेशी यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीमध्ये भाजपच्यावतीने नेहा राहुल काकडे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने मंजुषा साखरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे धाराशिव नगराध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. 


 
Top