कळंब (प्रतिनिधी)- रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी जगद् गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या सिद्ध पादुका पुजन व दर्शन प्रवचन सोहळ्याच्या आयोजन डिकसळ येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात दि. 9 नोव्हेंबर रोजी रविवार सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
दि. 9 रोजी सकाळी कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य-दिव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे . प्रथम स्थानी कलशधारी महिला ,ध्वजधारी पुरुष, विविध पथके ,भजनी मंडळ , संबळ पथकासह सहभागी होणार आहेत . जगद्गुरुश्रींचे नामघोष करत रथातुन जगद्गुरुश्रींच्या सिद्धपादुका व प्रतिमेची मिरवणूक सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. त्यात अनेक देखावे सादर केले जाणार आहेत . कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभायात्रा पोहोचल्यावर तेथे प्रथम जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुका पूजन , व त्यानंतर सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातुन तीस ते चाळीस हजार भाविक भक्त या वेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्ताने लाभ घ्यावा असे आवाहन रामानंद संप्रदाय जिल्हा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख विलास मुळीक यांनी दिली आहे.
