उमरगा (प्रतिनिधी)- प्रगती सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव शाखा उमरगा सहाय्यक संचालक व रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी ठेवून प्रगती सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव शाखा उमरगा येथे प्रगती पतसंस्था व सुधन गोल्ड लोन यांचे सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गुरूवार दि. 30 रोजी करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाची सुरुवातीला दीप प्रज्वलनाने झाली असून प्रगती पतसंस्थेचे प्रमुख मोहन सावंत, सुधन गोल्ड लोन चे एरिया मॅनेजर धर्मराज मोरे यांनी दीप प्रज्वलन करून लक्ष्मीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.  या कार्यक्रमासाठी उमरगा शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला असून 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रगती पतसंस्थेचे शाखाधिकारी महेश फंड, रोखपाल निखिल सोमवंशी, लिपिक सौ. मीना काळे, सुधन गोल्डचे उमरगा येथील सेल्स ऑफिसर  सौदागर प्रभळकर, उमरगा शहरातील तरुण  सागर पाटील, मलिकार्जुन हबू अमोल जाधव, राजेंद्र माने, अंबादास रुद्राक्ष, महेश शिंदे, गोपाळ मोदानी, अजय तरमोडे, विलास पवार, सौरभ सूर्यवंशी, महेश आंबुलगे, अझरुद्दीन तांबोळी, निखिल इंगळे, पवन माने, विठ्ठल माने, सूरज सुतार, शुभम लोहार, श्रीधर लोहार, हनुमान सूर्यवंशी, वसंत माने तसेच एरिया मॅनेजर धर्मराज मोरे यांनी रक्तदान केले. 

सर्व रक्तदात्यांना प्रगती सहकारी पतसंस्था व श्रीकृष्ण ब्लड बँक उमरगा यांचेकडून रक्तदात्याला सुरक्षितता जबाबदारी म्हणून हेल्मेट व पाणी बॉटल देण्यात आले. तसेच श्रीकृष्ण ब्लड बँक उमरगा यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. कार्यक्रमाची सांगता उमरगा शाखेचे शाखाधिकारी महेश बंडू फंड यांचा वाढदिवस साजरा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी उमरगा परिसरातील तरुणांनी रक्तदान करून सहकार्य केले. त्याच्याबद्दल प्रगती पतसंस्थेच्या आणि सुधन गोल्ड लोन यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

 
Top