तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या तुळजापूर तालुक्यातील संघटन बळकटीकरणाच्या उपक्रमांतर्गत, तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील असंख्य उत्साही युवकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
या प्रवेश सोहळ्याला शहराध्यक्ष अमर चोपदार, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते अनिल शिंदे, ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तोफिक शेख, आकाश शिंदे, विवेक शिंदे, शरद जगदाळे, अमर चोपदार, रुबाब पठाण, अक्षय परमेश्वर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत युवकांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला. आगामी तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा प्रवेश पक्षाला नवचैतन्य देणारा ठरणार आहे.
%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE.jpg)