कळबं (प्रतिनिधी)- येथील बस आगार मागील काही वर्षापुर्वी उत्पन्न व प्रवासी वाढवा अभियानात मराठवाड्यात प्रथम असलेला कळंब आगाराला ढिसाळ नियोजन व कामचुकारपणा यामुळे घरघर लागल्याचे गंभिर चीत्र दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कळंब आगार हा छत्रपती संभाजी नगर विभागातील एक प्रमुख आगार बनला होता. एकेकाळी उत्पन्न, प्रवाशी व सेवा या कसोटीवर प्रगतीच्या उच्च शिखरावर असलेल्या या आगाराने जिल्हा व विभाग स्तरावर आपला वेगळाच ठसा ऊमटलवला होता.
परंतु या आगाराचे कर्तृत्ववान कारभारी बदलले गेले अन् आगाराच्या उत्तुंग यशाचा आलेख दर महिन्याला घसरत चालल्याचे गंभीर चीत्र अलिकडील काळात अनुभवयास मिळाले आहे.बस आहेत तर कर्मचारी नाहीत, कर्मचारी आहेत तर बस अपुऱ्या अशी सातत्याने अवस्था निर्माण होणारा हे आगार आत्ता प्रवासी संख्या व उत्पन्नातही मागे राहत आहे. कळंब आगाराला ढिसाळ नियोजन, कालमर्यादा भंग, मनमानी कारभार यामुळे घरघर लागली आहे. यातही प्रमुख अधिकारी उंटावरून शेळ्या राखत असल्याने याचा आगाराला तर फटका बसत आहेच शिवाय प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
कोणाचा पायपोस कोणाला नाही.
कळंब आगाराची कारभार सध्या "आंधळा राजा, गोंधळी प्रजा"या उक्तीप्रमाणे झाला असून आगार प्रमूख, स्थानक प्रमुख, कार्यशाळा व वाहतूक नियंत्रक यांच्यात ताळमेळ राहिलेला नाही. याचीच परिणिती वाहतुक व्यवस्थेवर झालेली दिसून येत असून लांब पल्ल्याच्या गाडय़ा दोन दोन तास विलंबाने मार्गस्थ होत आहेत.याचा प्रवासी संख्येवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. ग्रामिण मार्गावरील अनेक गाड्यांना आपला टाईम टेबल राखता येत नसल्याचे चीत्र आहे..
गाड्यांची दुरवस्था
कळंब आगाराच्या अनेक गाड्यांची अवस्था विदारक अशी झाली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. वेळेवर स्वच्छता केली जात नाही. अनेक गाड्यांच्या खिडक्या, दरवाजे नादुरूस्त आहेत. अनेक गाड्यांवर नावाच्या पाट्या नसतात, असल्या तरी त्या स्पष्ट अक्षरात नसतात. एकुणच कळंब आगाराचे केवळ नियोजनच ढिसाळ असून गाड्याची अवस्थाही विदारक अशी आहे.
कोणीही या जाहिरात करा
कळंब स्थानक आवारात बेलगामपणे जाहिरातबाजी केली जात असून कोणीही येवून आपली ब्रँडची जाहीरात करत आहे. यावर आगार प्रमूखांचे कसलेही नियंत्रण नाही. स्थानकातील स्पिकरवर व्यवस्थित पुकारले जात नाही. प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे
या बाबत आगार प्रमुखांना विचारले असता त्यांनी सांगितलेकी एस. टी . आगारात कर्मचारी कमी आहेत ,त्यामूळे असे प्रकार घडत आहेत आपन त्याची सुधारणालवकरच करणार आहोत
बालाजी भारती प्रभारी आगार प्रमुख . कळंब
एस . टी चा कारभार हा उंठावरून शेळया राखलागत चा प्रकार आहे सुधारणा होणे ही काळाची गरज आहे , नाही तर लवकरच डेपोला शासन कुलूप लावेल
प्रवाशी मित्र संघटना
बस वेळेवर जात नाहीत ,मुला मुलींना शाळा कॉलेज ला जाणे साठी उशिर होत आहे ,मागणी नुसार बस गाडया सोडत नाहीत त्यामुळे आनेक विद्यार्थी ए्सटीचा पास काडून ही शिझण शाळेपासून वंचित राहावे लागत आहे ,
एक संतप्त विद्यार्थी
