परंडा (प्रतिनिधी)- सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे एक एक मत महत्त्वाचे आहे एका मताने सरकार बनते व एका मताने सरकार पडते म्हणून प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्रनिर्मिती साठी सहभाग निश्चित केला पाहिजे. देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे.असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले. 

परंडा येथील नगर परिषद व महाराष्ट्रात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या 2025 अंतर्गत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव आणी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने यांच्या नेतृत्वाखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद परंडा सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदार जनजागृती अभियान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे अधिकारी किरण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होते व्यासपिठावर मतदार जनजागृती अभियानाचे डॉ.शहाजी चंदनशिवे, किरण शिंदे ,प्रा.तानाजी फरतडे प्रा.विलास गायकवाड यांची उपस्थिती होती.यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ भागातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी सामूहिकरीत्या मतदान करण्याची शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण शिंदे यांनी केले तर आभार प्रा. तानाजी फडतरे यांनी मानले.

 
Top