परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील भूमिपुत्र अमित गोकुळ लोकरे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगच्या (MPSC) परिक्षेत महाराष्टातून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सवीय सहाय्यक बाळराजे मुळीक यांचे अमीत गोकुळ लोकरे हे भाच्चे आहेत. अमीत गोकुळ लोकरे यांचा सत्कार बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल मोटे व बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.यादव यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.अमीत लोकरे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
