परंडा (प्रतिनिधी)-  शहरातील राजापुरा गल्ली येथील रहिवासी रुपेशसिंह उमेशसिंह सद्दीवाल (वय 40) यांचे सोमवार दि.17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पुणे येथे हॉस्पीटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर परंडा येथे बावची रस्त्यावरील स्मशानभुमीत मंगळवार दि.18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रासह व्यापारी वर्गातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडील असा परिवार आहे. ते माजी आमदार कै.चंदनसिंह सद्दीवाल यांचे नातु व माजी नगराध्यक्ष उमेशसिंह सद्दीवाल यांचे सुपुत्र होत. रूपेशसिंह सद्दीवाल यांच्या निधनामुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top