धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस उप निरीक्षक जाकिर पटेल, पोलीस हावलदार तेलप, पवार तसेच महिला पोलीस हावलदार- सोनाली जाधव, महिला पोलीस नाईक रोहिणी धुमाळ, पिंक पथक बीट अंमलदार संजय राठोड, वैशाली कोरे, आकाश सुरनर यांचेसह पोलीस पथकाने सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे भेट दिली.
त्यावेळी शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीसांविषयी समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सायबर आवरनेस तसेच सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदर भेटी दरम्यान शाळेचे सरस्वती विद्यालय शाळेचे 925 विद्यार्थी, मुख्याध्यापक वडणे, शिक्षक वृंद, कर्मचारी माजी सरपंच दत्ता वडणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.
