धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील जुनोनी- वलगुड -झरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. त्याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या हस्ते शेख यांचा सत्कार करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटामध्ये अनेकजण प्रवेश करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागाची जाण असलेले व त्यांच्या समस्या सोडविणारे उपसरपंच इरशाद शेख यांनी प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रवेश पक्षासाठी बळकटी देणारा ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा संघटक पाटील यांनी शेख यांचा सत्कार केला आहे. यावेळी आदित्य भैया पाटील सीईओ आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, साहेबराव देशमुख, शहाजीराव देशमुख, महेश शिंदे, तांबारे आदी उपस्थित होते.

 
Top