उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा नगरपरिषद निवडणूक 2025 करीता भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे युवा नेते हर्षवर्धन भैय्या शिवाजीराव चालुक्य यांनी दि.13 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येरमे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
याप्रसंगी भाजपाचे उमरगा - लोहारा विधानसभा प्रमुख राहुल पाटील सास्तूरकर, धाराशिव जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार,माजी तालुकाध्यक्ष शहाजी पाटील ,माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड,माजी नगरसेवक गोविंद घोडके, विष्णू बिराजदार,अमर वरवटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
