नळदुर्ग (प्रतिनिधी)- सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 65 वरती अणदूर (ता.तुळजापूर) येथील चिवरी पाटी येथे शनिवारी (दि .22) सकाळी 10 च्या सुमारास क्रुझर गाडी (एम एच 24 व्ही 4948) या सोलापूर कडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझर गाडीचा अपघात झाल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला.गाडीमध्ये तेरा प्रवाशी प्रवास करीत होते. यात चार पुरुष, चार महिला, पाच लहान मुले अशी संख्या होती. दहा जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये गाडी चालकाच्या पत्नीचा ही जागी मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की, प्रवासी रस्त्याच्या तीन 30 ते 40 फूट दूरवरती जाऊन पडले.गाडीचा चक्काचूर झाला. क्रुझर गाडी दुभाजकाला धडकून बाजूला थांबलेल्या ट्रॅक्टर वरती येऊन आदळली. आपघात ठिकाणी मोठा आवाज झाला.पलटी झालेल्या क्रुझरला स्थानिक नागरिकांनी मदत करीत सरळ करून जखमींना बाहेर काढले.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या ॲम्बुलन्सने नळदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले. यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील उळे येथील तर काही पुणे येथील असून ते सोलापूर वरून उमरगाच्या दिशेने जात होते.

अपघातात साक्षी बडे, सोनाली कदम, पूजा शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमीमध्ये आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम, कार्तिक आमराळे  (राहणार उळे, जिल्हा सोलापूर /पुणे) येथील रहिवाशी आहेत. अपघातामुळे अणदूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top