धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी 1 वाजता धाराशिव येथील विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे आगमन प्रसंगी स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर व पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचेही आगमन झाले. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र चि. मल्हार व चि. सौ. का. साक्षी यांच्या विवाह प्रसंगी उभयतांना शुभेच्छा दिल्या.
विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन.व्हि.भंडे,कार्यकारी अभियंता केत उपस्थित होते.
