तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, तुळजापूर यांच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अशी माहिती सभापती सुनील जाधव यांनी दिले.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, ‘ई-समृद्धी' लिंकवर सेल्फ रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या नोंदणी पावत्या आणि आवश्यक कागदपत्रे खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात लवकरात लवकर जमा करावीत, असे आवाहन तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे सचिव यांनी केली आहे.
