धाराशिव (प्रतिनिधी)-  सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यावश्यक असणारा योग प्राणायाम ध्यानसत्र भोसले हायस्कूल धाराशिवच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फूर्त प्रतिसाद दिला.

आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षक लक्ष्मण काकडे जिल्हा समन्वयक कर्मयोग विभाग धाराशिव यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत व सहज समजेल अशा प्रकारे ध्यान योग प्राणायाम याचे प्रात्यक्षिक करून घेतले. सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये मनशांती व आनंदी मन ही प्रत्येकाची आवश्यकता आहे. सध्याचे शैक्षणिक जीवन व वाढता ताण तणाव यावरती उपाय म्हणून योग व ध्यान यावरती अतिशय प्रभावीपणे उपयुक्त ठरू शकतो असे मत यावेळी लक्ष्मण काकडे यांनी व्यक्त केले. प्रशालेच्यावतीने सर्व शिक्षक वृंदाने यामध्ये सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कार्यक्रम आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला व मनाची एकाग्रता वाढली. तसेच मन आनंदी झाले. अशा प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केल्या.

 
Top