उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील आष्टा जहागीर येथे दि.27 नोहेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत संतयोगी दामोदर मठ संस्थांनात मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ,किर्तन सोहळा अदिंचे अयोजन करण्यात आले असुन दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.
पहाटे 4ते6 काकडा अरती, 6ते 7 विष्णूसहस्त्रनाम,7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण,11 ते 12 गाथा भजन ,12 ते 2 भोजन , 2:30 ते 5 श्री शिवपुराण कथा,5:30 ते 6: 30 हरिपाठ, 7 ते 9 किर्तन, 10 त 4 हरिजागर होणार असुन, दि.27 रोजी दीपप्रज्वलन नंदाताई व माजी प्रधान सचिव व्यंकटराव गायकवाड, ग्रंथ पुजन उषाताई व माजी खासदार रविंद्र गायकवाड, विणा पुजन दिपक मुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सप्ताहाच्या अरंभापासुन ते सांगता पर्यंत व्यासपिठ अधिकारी हभप. बालाजी महाराज मुळे, हभप. विठ्ठल महाराज गायकवाड, गुरुचरित्र ग्रंथ वाचन अविनाश कुलकर्णी, व श्री शिवमहापुराण कथा सेवा, प्रवक्ते महंत तेजसनाथ महाराज अगजाप्पा देवस्थान कराळी यांची होणार आहे.
गुरुवार दि.27 नोव्हेंबर रोजी हभप. भुषण महाराज तळणीकर, शुक्रवार दि 28 नोव्हेंबर रोजी हभप. श्रीपाद महाराज सातारा, शनिवार रोजी दि.29 नोव्हेंबर रोजी हभप. कृष्णा कुलकर्णी महाराज मुंबई, रविवार दि. 30 नोव्हेंबर रोजी हभप. निलेश महाराज चव्हाण कील्लारी,सोमवार 1 डिसेंबर रोजी हभप. राजेश पाटिल महाराज गुंजरगा, मंगळवार दि.2 डिसेंबर रोजी नितीन महाराज कवळी हिप्परगा, बुधवार दि.3 डिसेंबर रोजी 2 ते 4 दामोदर मठाचे मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांचे काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. मठ संस्थानच्या वतिने सकाळी 10 पासुन सार्वजनिक महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सर्व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दामोदर मठ संस्थानचे मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज व आष्टा जहागीर येथील समस्त ग्रामस्थांनी केले आहे.
